भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली हरीकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग

jhali harikatha rang vorasala | uchitasi ala pandurang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाली हरीकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥१॥ वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेई रे तूं आतां धणीवरी ॥ध्रु.॥ प्रेम देऊनियां अवघीं सुखीं केलीं । जें होतीं रंगलीं विठ्ठली तीं ॥२॥ तुकें हें दुर्बळ देखियलें संतीं । म्हणउनि पुढती आणियेलें ॥३॥