भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाले समाधान । तुमचे धरिले चरण

jhale samadhan | tumache dharile charan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥१॥ आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥ सुरवाडिकपणें । जेथें सांपडलें केणें ॥२॥ तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग ॥३॥