भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाला हा डांगोरा । मुखीं लहानही थोरा

jhala ha dangora | mukhin lahanahi thora

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाला हा डांगोरा । मुखीं लहानही थोरा ॥१॥ नागविलों जनाचारीं । कोणी बैसों नेदी दारी ॥ध्रु.॥ संचिताचा ठेवा । आतां आला तैसा घ्यावा ॥२॥ तुका म्हणे देवें । केलें आतां हें बरवें ॥३॥