भजनी मालिका
← भजनांकडे परत

झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची

jhad maroniyan baisalon pangati | uthavitan phajiti datayachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥ काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥ घेईन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥२॥ तुका म्हणे जालों माना अधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥३॥