भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू

jhad kalpataru | na kari yachakin avheru

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥१॥ तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥ परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥२॥ गाऱ्हाण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥३॥