भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य

jevin navajvaren tapalen sharir | lage taya kshir vishatulya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥१॥ तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥ कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥२॥ तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥३॥