भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें मुख्यत्वें करावी भक्ति । घडावी संतांची संगती । हेंचि मागणें तुम्हाप्रतीं । द्यावें निश्चिती मज देवा

jethen mukhyatven karavi bhakti | ghadavi santanchi sangati | henchi maganen tumhapratin | dyaven nishchiti maj deva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथें मुख्यत्वें करावी भक्ति । घडावी संतांची संगती । हेंचि मागणें तुम्हाप्रतीं । द्यावें निश्चिती मज देवा ॥१॥ पुरवा पुरवा माझा हेत । दुजें मागणें नाहीं निश्चित ॥धृ॥ आयुष्य अंतवरी नामस्मरण । गीता भागवताचें श्रवण । विष्णु शिवमूर्तींचें ध्यान । हेंच देणें सर्वथा ॥२॥ ऐकोनी ऐसें वचन । जनार्दन तुष्टला प्रेमें करुन । एका जनार्दनीं पाय धरुन । सप्रेमें आलिगिंला ॥३॥