भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें

jethen javen tethen kapal sarisen | labh to visheshen santasangen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥१॥ पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥ भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥२॥ तुका म्हणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥३॥