भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ

jethen athavati svamiche te pay | uttam te thay ramya sthal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥ रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥ध्रु.॥ धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥२॥ तुका म्हणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥३॥