भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । ते उभे वांडेंकांडें पंढरीये

jen vedansi natude shrutinsi sankaden | te ubhe vandenkanden pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । ते उभे वांडेंकांडें पंढरीये ॥१॥ न माये चराचरीं योगियांच्या ध्याना । तया म्हणती कान्हा नंदाचा जो ॥२॥ आगम निगम लाजोनी राहिले । तया बांधिती वहिलें उखळासी ॥३॥ काळाचा जो काळ भक्ता प्रतिपाळ । तया भेडविती बागुल आला म्हणोनी ॥४॥ बारा चौदा सोळा अठरा विवादती । तो गायी राखी प्रीती गोकुळांत ॥५॥ एका जनार्दनीं भक्तीचा भुकाळू । खाय तुळसीदळू भाविकांचें ॥६॥