भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरुप । पुजा ध्यान जप त्यासी नाहीं

jen jen drushti dise ten ten harirup | puja dhyan jap tyasi nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरुप । पुजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥ वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥ वैष्णवांचे गुह्मा मोक्षाचा एकांत । अनंताचा अंत पाहतां नाहीं ॥३॥ आदि मध्य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥४॥ एकाकार झाले जीव तोचि दोन्ही । एकाजनार्दनी ऐसें केलें ॥५॥