भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें द्रौपदीनें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें

jen draupadinen smarilen | ten vitevari shobhalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जें द्रौपदीनें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥१॥ जें अर्जुन स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥२॥ जेणें गजेंद्रा उद्धारिलें । तें विटेवरी शोभलें ॥३॥ जें हनुमंतें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥४॥ जें पुंडलिके ध्याइलें । ते एका जनार्दनीं देखिले ॥५॥