भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण

jen deva durlabh sthan | manushyasi ten sopen jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥ या ब्रह्माडांमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥ एक एक पाऊल तत्त्वतां । घडे अश्वमेध पुण्यता ॥३॥ एका जनार्दनीं ठसा । विठ्ठल उभाची सरसा ॥४॥