भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे या नेले संता शरण । जन्ममरण चुकलें त्या

je ya nele santa sharan | janmamaran chukalen tya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जे या नेले संता शरण । जन्ममरण चुकलें त्या ॥१॥ मागां बहुतां अनुभव आला । पुढेंहि देखिला प्रत्यक्ष ॥२॥ महापापी मूढ जन । जाहले पावन दरुशनें ॥३॥ एका जनार्दनीं संत । कॄपावंत दयाळू ॥४॥