भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे जे भक्तांची आवडी । तया संकटीं घाली उडी । वाढवी आपुली आपण गोडी । करी जोडी नामाची

je je bhaktanchi avadi | taya sankatin ghali udi | vadhavi apuli apan godi | kari jodi namachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जे जे भक्तांची आवडी । तया संकटीं घाली उडी । वाढवी आपुली आपण गोडी । करी जोडी नामाची ॥१॥ होय तयांचा अंकित । नेणें लहान थोर मात । आपुलें आपण पुढें धांवत । न सांगतां करी सर्व ॥२॥ एका जनार्दनीं कनवाळ । पतितपावन म्हणवी दयाळ । माता स्नेहें परीस सबळ । भक्तांलांगीं स्वयें रक्षी ॥३॥