भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया ठायीं जैसा भाव । प्रगटे देव तैसाची

jaya thayin jaisa bhav | pragate dev taisachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जया ठायीं जैसा भाव । प्रगटे देव तैसाची ॥१॥ हा तो जगी अनुभव । नुपेक्षी देव कवणासी ॥२॥ स्त्रियादि हीन याती । नामें तयां उत्तम गती ॥३॥ निंदका वंदका सम । गाता जोडे एकधाम ॥४॥ कृपाळु माऊली । एका जनार्दनीं साउली ॥५॥