भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया करणें आत्महित । स्वधर्म आचरावा सतत

jaya karanen atmahit | svadharma acharava satat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जया करणें आत्महित । स्वधर्म आचरावा सतत ॥१॥ कर्मे नित्य नैमित्तिक । ब्रह्माप्राप्ति लागीं देख ॥२॥ तींचि नित्य आचरावीं । चित्तशुद्धि तेणें व्हावी ॥३॥ एका जनार्दनीं कर्म । इश भक्तीचें हें वर्म ॥४॥