भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची

jay tikade lage pathin | nahin tuti athavachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥१॥ हिरोनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥ दावूनियां रूप डोळां । मन चाळा लावियेलें ॥२॥ आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥३॥ बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोई ॥४॥ तुका म्हणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥५॥