भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाय फाकोनियां निवडोनी गाईं । आपलाल्या सोयी घराचिये

jay phakoniyan nivadoni gain | apalalya soyi gharachiye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाय फाकोनियां निवडोनी गाईं । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥ घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे ॥२॥ गोविंदे वेधिलें तुका म्हणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥३॥