भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाय परते काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसे तरी

jay parate kay anila kantala | bola ek vela aise tari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाय परते काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसे तरी ॥१॥ कां हो केली तुम्ही निष्ठुरता देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥ भाग्यवंता त्यांसी सांगितल्या गोष्टी । ते नाहीं अदृष्ष्टी आमुचिया ॥२॥ तुका म्हणे तुम्हापासूनि अंतर । न पडे नाहीं स्थिर बुध्दी माझी ॥३॥