भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरी तुम्हां उबग आलासे दीनांचा

jari tumhan ubag alase dinancha

जरी तुम्हां उबग आलासे दीनांचा । अभिमान कोणाचा कोणाकडे ॥१॥ तारुं जाणें उदक आपण वाढविलें । हें तुम्हां न कळे कैसें देवा ॥२॥ यापरि पोसणा तुमचे उच्छिष्टाचा । भार तयाचा तुम्हां झाला ॥३॥ कर्ममेळा म्हणे जोडोनी ठेविलें । तेंचि वहिलें मज देईं ॥४॥