भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरी न बनेचि गुरुवचनीं । तरी बैसोनि सहजासनीं । हेंचि एक निर्वाणी । साधेजे सुख

jari na banechi guruvachanin | tari baisoni sahajasanin | henchi ek nirvani | sadheje sukh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जरी न बनेचि गुरुवचनीं । तरी बैसोनि सहजासनीं । हेंचि एक निर्वाणी । साधेजे सुख ॥१॥ सकळीं सकळपणें । अखंडरूप पाहणें । साध्य हेंचि साधनें । करुनी घेईं ॥२॥ जया संतचरणीं नाहीं भावो । त्यासी लडिवाळ संदेहो । तेथें साधनामाजीं देवो । दिसे कैसा ॥३॥ हेतु मातु अनुमाना । आकळी दृध एकमना । अधिकचि कल्पना । वाढविली ॥४॥ जाणीव नेणीव हें वाड । कल्पनेचें समूळ झाड । तुझें तुजचि आड । उभे ठाकती ॥५॥ नाना हेतु विवंचना । सांडुनियां कल्पना । एका जनार्दना । शरण रिघे ॥ मुमुक्षूंस उपदेश