भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मोनी प्राणी नाम न घेत वाचे । त्याचिया जन्माचें व्यर्थ वोझें

janmoni prani nam na ghet vache | tyachiya janmachen vyartha vojhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मोनी प्राणी नाम न घेत वाचे । त्याचिया जन्माचें व्यर्थ वोझें ॥१॥ प्रसवोनी तयां वांझ तो जननी । बुडविलीं दोन्हीं कुळें त्यानें ॥२॥ पूर्वज पतनीं पडती बेचाळीस । नाम न ये मुखास ऐसा प्राणी ॥३॥ एकाजनार्दनीं पतित दुराचारी । यम तया अघोरीं घालितसे ॥४॥