भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मोजन्मी केला लाग । म्हणोनि भाग पावलों

janmojanmi kela lag | mhanoni bhag pavalon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मोजन्मी केला लाग । म्हणोनि भाग पावलों ॥१॥ तेणें घडे संतसेवा । हेंचि देवा परम मान्य ॥२॥ आलिया जन्मांचे सार्थक । गांतां रामनाम देख ॥३॥ नामावांचुनी सुटिका । ब्रह्मादिकां नोहे देखा ॥४॥ नाम जपे शूलपाणी । एका जनार्दनीं ध्यानीं ॥५॥