भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मांतरीचें सुकृत आजी फळांसी आलें

janmantarichen sukrut aji phalansi alen

जन्मांतरीचें सुकृत आजी फळांसी आलें । ह्मणोनी देखिले विठ्ठलचरण ।।१।। धन्यभाग आजी डोळिया लाधलें । म्हणुनी देखिले विठ्ठलचरण ।। २ ।। धन्य चरण माझे या पंथ चालिले । म्हणुनी देखिले विठ्ठल चरण ।।३।। येऊनिया देहासी धन्य झाले । म्हणुनि देखिले विठ्ठलचरण ।। ४ ।। घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे । जन्मोजन्मीं देखेन विठ्ठलचरण ।। ५ ।।