भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची

janma jara tute karma | santasamagam ghadatanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥ उपदेश धरित पोटीं । दैन्ये दाही वाटी पळताती ॥२॥ खंडे फेरा चौर्‍यांशी । धरितां जीवेंशीं पाऊलें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ते दिनमणी प्रत्यक्ष ॥४॥