भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी

janma janmantari virahini | hoti dushchitta antahkarani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी । दुःखी सेशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थुळ कारणीं ॥१॥ येउने भेंटी देहीं देहातीत । तयाचा विरह मजलागीं होत । मना समुळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥ दुःख फिटलें मान जालें थोर । हर्षें आनंदें आनंद तुषार । एका जनार्दनीं भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ॥३॥