भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मा आलीयाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें

janma aliyacha labh | padmanabh darushanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्मा आलीयाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें ॥१॥ म्हणउनि लवलाहे । पाय आहे चिंतीत ॥ध्रु.॥ पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥२॥ बहु उसंतीत आलो । तया भ्यालो स्थळासी ॥३॥ कोण्या उपाये हे घडे । भव आंगडे सुटकेचे ॥४॥ तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥५॥