भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणिव नेणिवांच्या वाटा । खटपटा पंडुं नका

janiv nenivanchya vata | khatapata pandun naka

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणिव नेणिवांच्या वाटा । खटपटा पंडुं नका ॥१॥ संतां शरण जा रे आधीं । तुटे उपाधी तत्काळ ॥२॥ तेणें तुटें भवबंधन । आत्मज्ञान प्रगटे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संत परिपूर्ण उदार ॥४॥