भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती

janavalen indra charitra sakal | vankulya gopal davitati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥ तातडिने मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥ नेदाविया गाईं म्हसी वांचों लोक । पुरावे सकळिक सिळाधारीं ॥३॥ धाक नाहीं माझा गौळियां पोरां । सकळिक मारा म्हणे मेघां ॥४॥ म्हणविती देव आपणां तोंवरी । नाहीं जंव वरी कोपलों मी ॥५॥ मीपणें हा देव न कळे चि त्यांसी । अभिमानी राखी गर्वाचिया ॥६॥ अभिमानराशी जयाचिये ठायीं । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥ १२५१ जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥१॥ तरि म्यां बोलावें तें काई । सरे ऐसें तुझे पायीं ॥ध्रु.॥ पालटती क्षणें । संचितप्रारब्धक्रियमाण ॥२॥ तुका म्हणे सत्ता । होसी सकळ करिता॥३॥