भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणार जाणार देह हा जाणार । काय उपचार करिसी वायां

janar janar deh ha janar | kay upachar karisi vayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणार जाणार देह हा जाणार । काय उपचार करिसी वायां ॥१॥ मृत्तिकेचें घर बांधितां खचलें । तैसें परि जाहलें न कळे तुज ॥२॥ गृहधनदारा पुत्रपौत्र वायां । स्मरें देवराया एका भावें ॥३॥ एका जनार्दनीं घेई अनुतापा । चुकवीं खेपा हे जन्ममृत्यु ॥४॥