भजनी मालिका
← भजनांकडे परत

जननी हे म्हणे आहा काय झालें । शरीर रक्षिलें काय काजें

janani he mhane aha kay jhalen | sharir rakshilen kay kajen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जननी हे म्हणे आहा काय झालें । शरीर रक्षिलें काय काजें ॥१॥ काय काज आतां हरीविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥२॥ हें दुःख न सरे हरी न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥३॥ एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥४॥ करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका म्हणे ॥५॥