भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं

jan tari dekhen guntalen prapanchen | smaran ten tyachen tyasi nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं ॥१॥ म्हणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ध्रु.॥ इंद्रियांचा गाजे गोंधळ ये ठायीं । फोडीतसे डोई अहंकार ॥२॥ तुका म्हणे देवा वासनेच्या आटें । केलीं तळपटें बहुतांचीं ॥३॥