भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालों निर्भर मानसीं । म्हणऊनि कळलासी

jalon nirbhar manasin | mhanauni kalalasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जालों निर्भर मानसीं । म्हणऊनि कळलासी ॥१॥ तुझे म्हणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥ चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥२॥ तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥३॥ तुका म्हणे तेणें सुखें । निरसली जन्मदुःखे ॥४॥