भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ

jalon dvarapal | tujhen rakhilen sakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥१॥ नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥ करूनियां नीती। दिल्याप्रमाणें चालती ॥२॥ हातीं दंड काठी । उभा जिवाचिये साठी ॥३॥ बळ बुद्धी युक्ती । तुज दिल्या सर्व शक्ती ॥४॥ तुका म्हणे खरा । आतां घेईन मुशारा ॥५॥