भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालों बळिवंत । होऊनियां शरणागत

jalon balivant | houniyan sharanagat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जालों बळिवंत । होऊनियां शरणागत ॥१॥ केला घरांत रिघावा । ठायीं पडियेला ठेवा ॥ध्रु.॥ हातां चढलें धन। नेणं रचिलें कारण ॥२॥ तुका म्हणे मिठी । पायीं देउनि केली सुटी ॥३॥