भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं

jali tadatodi | avaghin padilon ughadin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥ नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥ पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥२॥ आतां म्हणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥३॥