भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाळी महा कर्मे । दावी नीजसुखवर्मे

jali maha karme | davi nijasukhavarme

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाळी महा कर्मे । दावी नीजसुखवर्मे ॥१॥ ऐसे कळले आम्हां एक । झालो नामाचे धारक ॥ध्रु.॥ तपाचे सायास । न लगे घेणे वनवास ॥२॥ तुका म्हणे येणे । कळीकाळ हे ठेंगणे ॥३॥