भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळातें संचित । ऐसी आहे धर्म नीत

jalaten sanchit | aisi ahe dharma nit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जळातें संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥१॥ माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळां मनीं ध्याय ॥ध्रु.॥ नेदी कर्म घडों । कोठें आडराणें पडों ॥२॥ तुका म्हणे मळ । राहों नेदी ताप जाळ ॥३॥