भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव श्मशानींचा

jala pretarup shariracha bhav | lakshiyela thav shmashanincha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव श्मशानींचा ॥१॥ रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥ वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां ब्रम्हत्वेसी ॥२॥ फिरविला घट फोडिला चरणीं । माहावाक्य ध्वनि बोंब जाली ॥३॥ दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पीलें ॥४॥ तुका म्हणे रक्षा जाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥