भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैशी देहापाशीं छाया । तैशी दिसे मिथ्या माया

jaishi dehapashin chhaya | taishi dise mithya maya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जैशी देहापाशीं छाया । तैशी दिसे मिथ्या माया ॥१॥ आत्मा शुद्ध काया मळीन । काया जड आत्मा चिदघन ॥२॥ जीव अलिप्त माया गुणी । माया वेष्टन जीवालागुनी ॥३॥ एका जनार्दनीं शिव । सदा असे स्वयमेव ॥४॥