भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें दुरी

jaisen chitta jayavari | taisen javali ten duri

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥१॥ न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर । असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥ अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥ तुका म्हणे बुद्धि । ज्याची ते च तया शुद्धी ॥३॥