भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाहली भाग्याची उजरी । संतसेवा निरंतरी

jahali bhagyachi ujari | santaseva nirantari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाहली भाग्याची उजरी । संतसेवा निरंतरी ॥१॥ हेंचि मज वाटे गोमटें । येणें भवभ्रम फिटे ॥२॥ करिता सावकाश ध्यान । होय मनाचें उन्मन ॥३॥ एका जनार्दनीं संत । सदा शांत अंतरीं ॥४॥