भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगीं तो व्यापक भरुनी उरला । शरण तूं तयाला जाय वेगीं

jagin to vyapak bharuni urala | sharan tun tayala jay vegin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगीं तो व्यापक भरुनी उरला । शरण तूं तयाला जाय वेगीं ॥१॥ उघडा मंत्र जाण वदे नारायणा । नोहे तुज विध्व यमदुत ॥२॥ अखंड वाचेसी उच्चार नामाचा । तेणें कलीकाळाचा धाक नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं संतसेवेविण । आणिक साधन नाहीं दुजें ॥४॥