भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगीं कीर्ति व्हावी । म्हणोनी जालासी गोसावी

jagin kirti vhavi | mhanoni jalasi gosavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जगीं कीर्ति व्हावी । म्हणोनी जालासी गोसावी ॥१॥ बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलेंसे दूर ॥ध्रु.॥ चित्तीं नाहीं अनुताप । लटिकें भगवें स्वरूप ॥२॥ तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥३॥