भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगीं जनार्दन मुख्य हाचि भाव । संत तेचि देववृति ऐसी

jagin janardan mukhya hachi bhav | sant techi devavruti aisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगीं जनार्दन मुख्य हाचि भाव । संत तेचि देववृति ऐसी ॥१॥ समाधी साधन संतजन । विश्रांतीचें स्थान संतापायीं ॥२॥ योगयाग धारण पंचाग्र्नि साधन । तें हें ध्यान संतापायीं ॥३॥ एका जनार्दनीं तयांचा सांगात घडो मज निश्चित सर्वकाळ ॥४॥