भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करीं वरदहस्तें मजवरी

jagatray janani muktabai mate | krupa karin varadahasten majavari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगत्रय जननी मुक्ताबाई माते । कृपा करीं वरदहस्तें मजवरी ॥१॥ आदिनाथें अनुग्रह नाथासी दिधला । नाथें हस्त ठेविला मस्तकीं तुमच्या ॥२॥ बाळलीला केली जगीं ख्याती मिरविली । चांगयाची हरली चौसष्ट कळा ॥३॥ कळा पासष्टावी ज्ञानदेवें दाविली । चांगयाची विराली अहं ममता ॥४॥ चांगदेव शरण कायावाचामनें । एका जनार्दनीं म्हणे तैशापरी ॥५॥