भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगाची ती रहाटी । जैशी अंधाहातीं दिली काठी । चिखलाची पाउती । काय मार्ग दिसे

jagachi ti rahati | jaishi andhahatin dili kathi | chikhalachi pauti | kay marga dise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगाची ती रहाटी । जैशी अंधाहातीं दिली काठी । चिखलाची पाउती । काय मार्ग दिसे ॥१॥ तैसे भुलोनियां जन । गेले म्हणती माझे जाण । बा कवणाचें कवण । कामा न ये शेवटीं ॥२॥ चालतो पाहतो ऐकतो कानीं । दुजियाचे गुणदोश मनीं । नका आणूं चुकवा पतनीं । पुढील पेणें अंतरू नका ॥३॥ हेंचि बोधाचें लक्षण । धरा हृदयीं याची खुण । शरण एका जनार्दन । वारंवार विनवितसे ॥४॥