भजनी मालिका
← भजनांकडे परत

जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव

jag avaghen dev | mukhya upadeshachi thev

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥१॥ आधीं आपणयां नासी । तरि उतरे ये कसीं ॥ध्रु.॥ ब्रम्हज्ञानाचें कोठार । तें हें निश्चयें उत्तर ॥२॥ तुका म्हणे ते उन्मनी । नास कारय कारणीं ॥३॥