भजनी मालिका
← भजनांकडे परत

जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती

jadalon angaangin | mag thevin prasangin | kanhin urijogi| lokin ahe purati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥१॥ ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तोचि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥ गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचे ठायीं । निवाड तो तई । अवकळा केलिया ॥२॥ तुका म्हणे ठावे । तुम्ही असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥३॥